Posts

Showing posts from July, 2020

Rafiyat...

Image
स्थळ जुहू.... पण दिवस, तारीख तशी  आठवत नाही, ठिकाण नक्की आठवतंय, दुपार होती.  आता जायचं होतं पण कसं  ?. पाय घुटमळत होते . मनात अनेक प्रश्न  होते, भीती होती.  तितक्यात " क्या चाहिये" कोणीतारो ओरडलं . मी काहीच उत्तर देऊ  शकलो नाही, उत्तर नव्हत देखील द्यायला. काही वेळ जातो ना जातो तोच एकाने विचारलं , " किसी की मिट्टी आयी है क्या". पटकन नाही म्हणून गेलो. पण आयष्याचं सत्य, सगळ्या प्रश्नांची उत्तरं होती त्या प्रश्नात. त्या प्रश्नाने आत जाण्याचा धीर आला.  नियमानुसार विधी उरकून आत गेलो. जाणते, बुजुर्ग बसले होते. त्यांच्याशी बोलता क्षणी त्यांनी झाहीद नामक इसमास हाक मारली.  "इनको बता दो जरा " असं म्हणताच तो अदबीने आत आला आणि मला घेऊन गेला. काही अंतर चालतो तोच समोर बोट करून "उधर, वो देखो सामने "  असं म्हणून तो इसम निघून गेला. ३१ जुलै रोजी त्याचा या पृथ्वी वरचा प्रवास संपून पुढील प्रवास सुरु झाला, तो माझ्या समोर होता . फक्त  ३१ जुल...