डॅनियलस् नावाचा मराठी माणूस...
१६ एप्रिल, प्रसिद्ध पियानो, अकॉर्डियन वादक, संगीत संयोजक, संगीतकार इनॉक डॅनियलस् यांचा वाढदिवस. १९५३ च्या 'गुळाचा गणपती' या सिनेमापासून पियानो वादक म्हणून आपल्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला सुरवात करणारा, अस्सल मराठी माणूस. आज वयाच्या ८७ व्या वर्षी देखील तितकाच तरुण, अदबशीर व साधा जाणवतो. त्यांच्यावरील प्रबंधाचे लिखाण देखील त्यांच्याच वाढदिवशी लिहून पूर्ण केले ही माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट.
मराठी चित्रपट संगीतातील त्यांचे अनमोल योगदान स्वीकारल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेले एक अजरामर गीत, " तुम्हावर केली मी मर्जी बहाल" हे त्यांच्या संगीत संयोजनाचे एक उत्तम उदाहरण सांगता येईल. यात डॅनियलस् यांनी कॉर्ड्स् सिस्टीम चा अतिशय उत्तम वापर केला आहे. वेस्टर्न हार्मनी वापरून सुध्दा ही लावणी अस्सल मराठी वाटते हे यातील विशेष.
अनेक प्रकारचे संगीत ऐकून, आत्मसात करून, त्याचा योग्य वापर करून भारतीय चित्रपट संगीत कसे अधिकाधिक समृद्ध करता येईल याचा डॅनियलस् यांनी सतत प्रयत्न केला. आजही अकॉर्डियन घेऊन ते संगीतात स्वतःचा आनंद शोधताना दिसतात. संगीतकार खय्याम साहेब म्हणत," इतने जंटलमन बहुत कम होते है".
आपणास खूप खूप शुभेच्छा...!
सागर अत्रे- सिने अभ्यासक
9158867111

Congratulations Sagar.
ReplyDeleteMany happy returns of the day to Daniel sir..
अभिनंदन सागर अत्रे💐
ReplyDeleteदयांनीअल। जिना सादर प्रणाम व वाढत्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💐💐
एकदा भेटायचे आहे त्यांना,तुम्ही मला मदत कराल ,कृपया
क्या बात है सागर ! हे तू मोठं आणि उत्तम काम केलं आहेस. फार आनंद झाला हें वाचून. आजच्या दिवशी हा प्रबंध पूर्ण करणे ही खास बाब आहे. इनॉक सरांना प्रणाम , वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐आणि तुझे अभिनंदन👌👌👌
ReplyDeleteपियानो वाजवितानाचा त्यान्चा फोटो फार देखणा आहे...मला आण्णासाहेब चितळ्कर यांचा अशाच पोज मधील रुबाब्दार फोटो आठवतो...
ReplyDeleteनमस्कार, अतिशय मृदू स्वभाव आणि उमद व्यकीमत्व असलेल्या इनॉक डॅनियलस् सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
ReplyDeleteवाह सागर जी
ReplyDelete