एक गुणी संगीतकार - आनंद मोडक.
प्रतिभावंत कलावंताकडे संगीतातील पराकोटीची संवेदनशीलता असेल तर ती त्याच्या प्रतिभेला नवे आयाम देते, इतरांपेक्षा त्याचे अलौकिकत्व सिद्ध करते.
डेक्कनवरच्या महिला निवास च्या जागेत घाशीराम कोतवालच्या तालमीतून आंनद मोडकांनी आपल्या कला सेवेची सुरवात केली. ही सुरवात आपल्या आयुष्याचा प्रवास कुठे नेणार याची पुसटशी कल्पना देखील त्यांना नव्हती. डिसेंबर 1972 मधील नोकरीची सुरवात आणि भरत नाट्य मंदिर मधला घाशीराम चा पहिला प्रयोग. घाशीरामचा तो प्रवास पुढे 20 वर्षे चालूच होता. भास्कर चंदावरकर, जब्बार पटेल यांसारखे गुरू मिळाले, रवींद्र साठे, चंद्रकांत काळे, सतीश आळेकर यांच्या सारखे मित्र मिळाले. 'आनंद पर्व' मधून एक एक गोष्टी उलगडल्या होत्या.
1995-96 च्या वेळेची गोष्ट. माझी आणि आनंद मोडक यांची 'महानिर्वाण'च्या निमीत्ताने भेट नियतीने घडवून आणली आणि 2014 साली ती नियतीनेच संपवली सुद्धा. पण 'महानिर्वाण', 'बदकांचे गुपित' च्या तालमीच्या आठवणी आजही तश्याच आहेत. भारतभर नाटकाचे दौरे, नाटकाच्या तालमी, कार्यशाळा सगळं सगळं अजून तसच डोळ्यासमोर आहे. मदन मोहन, रोशन ही तर त्यांची दैवतं. संगीत म्हणून दाखण्याची त्यांची सवय तर कमालच होती. सिने संगीता शिवाय नक्षत्रांचे देणे, साजणवेळा, शेवंतीचं बन, बदकांचे गुपित यांची गाणी नितांत सुंदर होती. मात्र आंनद मोडक यांच्या सारख्या गुणी संगीतकाराच्या कामाचं योग्य श्रेय त्याना मिळालं नाही हे मात्र स्वीकारावं लागेल. नाटक, संगीत, गाणं या शिवाय, नोकरीच्या शेवटच्या दिवसात केलेल्या चर्चा, त्यांच्या बरोबर घालवलेले क्षण वेळोवेळी ते जाणवून देत होते. त्यांच्या कामाची यादी खूप मोठी आहे जी मांडण्यापेक्षा त्यांचे संगीत समजावून घेता आले तर जास्त आनंद घेता येईल. त्यांच्या चाली अनवट, व अवघड वाटत पण चंद्रकांत काळे यांच्या बरोबर त्यांचे काम अनुभवायला मिळाले तेव्हा संगीत समजावून घ्यायचे असते ह्याची प्रचिती येत असे. मराठी संगीत नाटकातील त्यांचे योगदान फार महत्वाचे आहे, त्याशिवाय नव्या काळाचे, आधुनिक संगीत नाटक आपला कथाप्रवास पूर्ण करू शकणार नाही.
सागर अत्रे
सिने अभ्यासक व नाटयकलाकार.
9158867111

फारच छान. अतिशय उत्तम लेखनशैली. वाचन रंगात येत असतांनाच लेख संपतो.
ReplyDelete