Rafiyat...


स्थळ जुहू.... पण दिवस, तारीख तशी  आठवत नाही, ठिकाण नक्की आठवतंय, दुपार होती.  आता जायचं होतं पण कसं  ?. पाय घुटमळत होते . मनात अनेक प्रश्न  होते, भीती होती.  तितक्यात " क्या चाहिये" कोणीतारो ओरडलं . मी काहीच उत्तर देऊ  शकलो नाही, उत्तर नव्हत देखील द्यायला. काही वेळ जातो ना जातो तोच एकाने विचारलं , " किसी की मिट्टी आयी है क्या". पटकन नाही म्हणून गेलो. पण आयष्याचं सत्य, सगळ्या प्रश्नांची उत्तरं होती त्या प्रश्नात. त्या प्रश्नाने आत जाण्याचा धीर आला.  नियमानुसार विधी उरकून आत गेलो. जाणते, बुजुर्ग बसले होते. त्यांच्याशी बोलता क्षणी त्यांनी झाहीद नामक इसमास हाक मारली.  "इनको बता दो जरा " असं म्हणताच तो अदबीने आत आला आणि मला घेऊन गेला. काही अंतर चालतो तोच समोर बोट करून "उधर, वो देखो सामने "  असं म्हणून तो इसम निघून गेला. ३१ जुलै रोजी त्याचा या पृथ्वी वरचा प्रवास संपून पुढील प्रवास सुरु झाला, तो माझ्या समोर होता . फक्त  ३१ जुलै १९८० चा तो जनसागर इथे नव्हता. जाताना झाहीद काहीसं पुटपुटला , ते कानावर स्पष्टपणे पडलं , " वो उधर, नौशाद , उधर मधुबाला ...और न जाने कौन कौन ..."
ज्याने आयुष्यभर भरभरून दिलं , त्याला देण्यासाठी माझ्या कडे त्याक्षणी काहीही नव्हतं . पण ती कमी डोळ्यांनी भरून काढली होती. किती वेळ गेला माहित नाही. थोड्या वेळाने आशीर्वाद घेऊन निघालो.
मी इथे का आलो नीट सांगता येणार नाही. माझ्या आयष्यातलं त्यांचं स्थान असं समजावून सांगता येणार नाही. जरी तो मला अर्ध्यातच सोडून गेला तरीही  माझ्यासाठी तो एकमेव होता , आहे आणि राहील . कोणा शायराचे शब्द आठवत होते . 


" गम-ऐ -यार से शिकायात , कभी थी ना है  ना होगी 
हमे गैर से मोहब्बत,  कभी थी ना है  ना होगी "
"तेरे दामने वफा में , मुझे मिल गया है सबकुछ 
मुझे आरजू- ऐ- जन्नत ,  कभी थी ना है  ना होगी "

Comments

  1. अप्रतिम! रफीसाहेबांना श्रद्धांजली.

    ReplyDelete
  2. Humble and kind tribute by heart to Rafi sahab. And always have a proud for your extraordinary love for the legend 💙❤️

    ReplyDelete
  3. Kyaa baat sagar ... Kamaal

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एक गुणी संगीतकार - आनंद मोडक.