Posts

Showing posts from September, 2020

देव...आनंद.

 व्यवसायाने संगीत, कला क्षेत्राशी निगडित असल्याने सतत नवनवीन कलाकारांशी संबंध येत असे. अशातच एका नवीन कार्यक्रमाची कल्पना डोक्यात घोळत होती. एक रंगमंचीय सांगीतिक सादरीकरण करायची इच्छा होती. विषय होता अर्थात 'देव आनंद'. बस, ठरवलं हाच विषय अभ्यास करून सादर करायचा. गायकांशी बोलणं झालं होतं पण लिखाण अजून सुरू केलं नव्हतं. शशांक शेंडे शी विषय बोललो, कात्रणं, किस्से, गाणी अश्या माहितीची जमवाजमव सुरू केली. बऱ्यापैकी जुळून देखील आलं. पण मनात एक इच्छा होती, प्रत्यक्ष त्यांना भेटायचं, गप्पा मारायच्या. पण कसं?. इतका मोठा कलाकार, स्टार भेटायचा म्हणजे मुश्किल काम. इच्छा अजूनच प्रबळ होत होती. बस...ठरवलं, मुंबई गाठायची. देव ला भेटायचं. प्रश्नावली तयार करत होतो.अश्यातच कोणी तरी सुचवलं, अंबरीश मिश्र, तुला खूप मदत करतील. देव चे फॅन तर आहेतच पण अभ्यास दांडगा आहे. अंबरीश मिश्र यांची मुलाखत पार पडली. तब्बल चार तास, गप्पा किस कहाण्या..आणि देव आनंद चा फोन नंबर मिळाला. पूर्ण तयारीने देव आनंद ला फोन करण्यात आला. पहिलाच फोन, पलीकडून आवाज आला,"येस, देव स्पिकिंग" आणि मी बधिर झालो फोन देवालाच केल...

ऑनलाईन बिनलाईन - जबाबदार आईबापासाठी

ऑनलाईन बिनलाईन : मुलं सध्या काय शिकत आहेत ? Online हा शब्द आता अजिबात नवीन नाही. ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना देखील आता खूप सवयीची  झाली आहे. खूप मोठ्या संकटातून प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने जगण्याचा, पुढे जाण्याचा प्रयत्न देखील करतो आहे, यशस्वी होतो आहे. आलेल्या संकटाने आपल्याला जगण्याची , धडपडण्याची उर्मी आपणा सर्वांना दिली. अनेक नाती नव्याने अनुभवण्याची मोलाची  संधी दिली. अनुभवातून माणूस शिकतो हे अगदी तंतोतंत अनुभवायला मिळालं. Online world at large अनुभवताना small world around you तपासून बघता आलं. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून आबालवृद्ध शिकत होते, मन रमवत होते. नोकरी, शिक्षण, व्यवसाय सगळं कसं बदललं होतं, कात टाकत होतं. मोबाईल पासून मुलांना लांब ठेवा, योग्य अंतरावर ठेवा म्हणणारे आई बाप, पालक मोबाईल पासून मुलाना दूर जाऊ द्यायला तयार नव्हते. बदलत्या शिक्षणासमोर, पद्धतीसमोर पालक मुकाटपणे जमवून घेत होते. अर्थात प्रश्न पाल्याच्या भविष्याचा होता. आर्थिक हातघाईला आलेला सर्वसामान्य देखील तंत्रज्ञानाच्या अतिवापराबद्दल नाखूष पण मूग गिळून गप्प होता.  आता मोबाईल मुलांच्या आयुष्याचा ...