Posts

एक गुणी संगीतकार - आनंद मोडक.

प्रतिभावंत कलावंताकडे संगीतातील पराकोटीची संवेदनशीलता असेल तर ती त्याच्या प्रतिभेला नवे आयाम देते,  इतरांपेक्षा त्याचे अलौकिकत्व सिद्ध करते. डेक्कनवरच्या महिला निवास च्या जागेत घाशीराम कोतवालच्या तालमीतून आंनद मोडकांनी आपल्या कला सेवेची सुरवात केली. ही सुरवात आपल्या आयुष्याचा प्रवास कुठे नेणार याची पुसटशी कल्पना देखील त्यांना नव्हती. डिसेंबर 1972 मधील नोकरीची सुरवात आणि भरत नाट्य मंदिर मधला घाशीराम चा पहिला प्रयोग. घाशीरामचा तो प्रवास पुढे 20 वर्षे चालूच होता. भास्कर चंदावरकर,  जब्बार पटेल यांसारखे गुरू मिळाले,  रवींद्र साठे, चंद्रकांत काळे, सतीश आळेकर यांच्या सारखे मित्र मिळाले. 'आनंद पर्व' मधून एक एक गोष्टी उलगडल्या होत्या. 1995-96 च्या वेळेची गोष्ट. माझी आणि आनंद मोडक यांची 'महानिर्वाण'च्या निमीत्ताने भेट नियतीने घडवून आणली आणि 2014 साली ती नियतीनेच संपवली सुद्धा. पण 'महानिर्वाण',  'बदकांचे गुपित' च्या तालमीच्या आठवणी आजही तश्याच आहेत. भारतभर नाटकाचे दौरे, नाटकाच्या तालमी, कार्यशाळा सगळं सगळं अजून तसच डोळ्यासमोर आहे. मदन मोहन, रोशन ही तर त्यांची ...
Image
डॅनियलस् नावाचा मराठी माणूस... १६ एप्रिल, प्रसिद्ध पियानो, अकॉर्डियन वादक, संगीत संयोजक, संगीतकार इनॉक डॅनियलस् यांचा वाढदिवस. १९५३ च्या 'गुळाचा गणपती' या सिनेमापासून पियानो वादक म्हणून आपल्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला सुरवात करणारा, अस्सल मराठी माणूस.  आज वयाच्या ८७ व्या वर्षी देखील तितकाच तरुण, अदबशीर व साधा जाणवतो. त्यांच्यावरील प्रबंधाचे लिखाण देखील त्यांच्याच वाढदिवशी लिहून पूर्ण केले ही माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट. मराठी चित्रपट संगीतातील त्यांचे अनमोल योगदान स्वीकारल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेले एक अजरामर गीत, " तुम्हावर केली मी मर्जी बहाल" हे त्यांच्या संगीत संयोजनाचे एक उत्तम उदाहरण सांगता येईल. यात डॅनियलस् यांनी कॉर्ड्स् सिस्टीम चा अतिशय उत्तम वापर केला आहे. वेस्टर्न हार्मनी वापरून सुध्दा ही लावणी अस्सल मराठी वाटते हे यातील विशेष. अनेक प्रकारचे संगीत ऐकून, आत्मसात करून, त्याचा योग्य वापर करून भारतीय चित्रपट संगीत कसे अधिकाधिक समृद्ध करता येईल याचा डॅनियलस् यांनी सतत प्रयत्न केला. आजही अकॉर्डियन घेऊन ते...

Prajaktach zaad

हल्लीच एका रुळलेल्या सामाजिक कार्यक्रमात एक  प्राजक्ताचं झाड दिसलं, त्या झाडाची मुळही दिसली , घट्ट मातीत रुजलेली, आईला घट्ट चिटकून बसलेली मुलं असतात तशी. त्यांची भेट नाही झाली. भेट घ्यायची  हिम्मत नाही झाली.  कोणत्या  तोंडाने भेटणार, काय काय बोलणार ? प्रश्न पडत होते. कार्यक्रमाची सांगता झाली, आवराआवर करत  होतो. पण मनातून विषय दूर होत नव्हता. सत्यभामा-रुक्मिणी ची कहाणी डोक्यात घोळत होती.  प्राजक्ताचं झाड कोणी लावलं, कोणासाठी लावलं आणि कोणाच्या पदरातली फुलं ते वेंचतंय? कोणत्या निर्माल्याच तुम्ही फुल करताय ?.  सगळंच अतर्क्य आहे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं इतकं सोपं तत्वज्ञान सांगायला संत व्हावं लागत नाही. हेच सारखं जाणवत होतं. व्यवस्थेचे गोळे पचवत हे जग नक्की चाललंय कुठे . इतकं बेरकी का झालं आहे चांगुलपण. गाडगी मडकी घेऊन आयुष्य सत्कारणी लावणाऱ्या या संतांच्या जगात, ताव मारून, बोटं पुसत का चर्चिलं जातं शहाणपण ? डॉक्टर प्राजक्ता, डॉक्टर अभिजित माफ करा पण आम्ही माणसं नाही. माणसासारखी माणसं नाहीत. आमच्या असण्याला नोटेचा रंग आहे, प...

किसे अपना कहू...

किसे अपना कहू किसे पराया अभी हमने कुछ सोचा नही है वो खुद को केहते है वतन परस्त पर हमने तो अभी आजमाया नही है दिया बन के रौशनी दे बस, गुरूर न कर हमने तूम्हे अभी सुरज कहा नही है करेंगे तूम्हे हम याद दुवाओमें सैय्यद मगर क्या करे तू अभी जिंदा है मरा नहीं है..

Middle class

सोनेतारणावर  कर्ज देणारी जाहिरात आणि तेल लावून  शांत झोप येते असे सांगणारी जाहिरात करताना जेव्हा एकच माणूस  दिसतो व ती जाहिरात दुसऱ्या कंपनीचे तेल लावत झोपी जातो तो वर्ग किंवा दात स्वच्छ ठेवा सांगणारे आणि पानमसाला सेवन करा सांगणारी जाहिरात करणारे एकाच घरातले असतात, ते सहज हसत हसत पचनी  पडून झोपी जाणारा  वर्ग  म्हणजे मिडल क्लास.