Posts

दिलीपकुमार आता नको वाटतो

 दिलीपकुमार आता नको वाटतो त्यावेळेस ठीक होतं, अभिनयाशी जेव्हा नात होतं शब्दांना महत्व आणि उच्चाराना अस्तित्व होतं आता या सगळ्यांचा तोच तोच पणा जाणवतो म्हणून दिलीपकुमार आता नको वाटतो सिनेमाला आशय होता, सुरवात मध्य शेवट होता हव्या हव्याश्या नटी आणि विनोदाचा हात होता आताशा याशिवाय सुद्धा सिनेमा होतो म्हणून दिलीपकुमार आता नको वाटतो चालण्या-बोलण्यात ढब होती, वागण्या-समजण्यात अदब होती भाषेची मजा आणि उत्तम गाण्याची साथ होती पॅटर्न लावून कोणत्याही भाषेत आता सिनेमा होतो म्हणून दिलीपकुमार आता नको वाटतो भडक कपड्यात अन पिळदार शरीरात नट सहज लपून जातो डझनभर नटांमुळे थोडा थोडाच सिनेमा वाट्याला येतो मुक्त सिनेमा जेव्हा स्वैर होतो मनोरंजनासाठी फक्त मसाल्याचं एक गाठोडं होतो सोनेरी काळ तेव्हा डोळ्यामधून वाहू लागतो म्हणून दिलीपकुमार आता नको वाटतो रफीसा 11/12/2020

देव...आनंद.

 व्यवसायाने संगीत, कला क्षेत्राशी निगडित असल्याने सतत नवनवीन कलाकारांशी संबंध येत असे. अशातच एका नवीन कार्यक्रमाची कल्पना डोक्यात घोळत होती. एक रंगमंचीय सांगीतिक सादरीकरण करायची इच्छा होती. विषय होता अर्थात 'देव आनंद'. बस, ठरवलं हाच विषय अभ्यास करून सादर करायचा. गायकांशी बोलणं झालं होतं पण लिखाण अजून सुरू केलं नव्हतं. शशांक शेंडे शी विषय बोललो, कात्रणं, किस्से, गाणी अश्या माहितीची जमवाजमव सुरू केली. बऱ्यापैकी जुळून देखील आलं. पण मनात एक इच्छा होती, प्रत्यक्ष त्यांना भेटायचं, गप्पा मारायच्या. पण कसं?. इतका मोठा कलाकार, स्टार भेटायचा म्हणजे मुश्किल काम. इच्छा अजूनच प्रबळ होत होती. बस...ठरवलं, मुंबई गाठायची. देव ला भेटायचं. प्रश्नावली तयार करत होतो.अश्यातच कोणी तरी सुचवलं, अंबरीश मिश्र, तुला खूप मदत करतील. देव चे फॅन तर आहेतच पण अभ्यास दांडगा आहे. अंबरीश मिश्र यांची मुलाखत पार पडली. तब्बल चार तास, गप्पा किस कहाण्या..आणि देव आनंद चा फोन नंबर मिळाला. पूर्ण तयारीने देव आनंद ला फोन करण्यात आला. पहिलाच फोन, पलीकडून आवाज आला,"येस, देव स्पिकिंग" आणि मी बधिर झालो फोन देवालाच केल

ऑनलाईन बिनलाईन - जबाबदार आईबापासाठी

ऑनलाईन बिनलाईन : मुलं सध्या काय शिकत आहेत ? Online हा शब्द आता अजिबात नवीन नाही. ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना देखील आता खूप सवयीची  झाली आहे. खूप मोठ्या संकटातून प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने जगण्याचा, पुढे जाण्याचा प्रयत्न देखील करतो आहे, यशस्वी होतो आहे. आलेल्या संकटाने आपल्याला जगण्याची , धडपडण्याची उर्मी आपणा सर्वांना दिली. अनेक नाती नव्याने अनुभवण्याची मोलाची  संधी दिली. अनुभवातून माणूस शिकतो हे अगदी तंतोतंत अनुभवायला मिळालं. Online world at large अनुभवताना small world around you तपासून बघता आलं. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून आबालवृद्ध शिकत होते, मन रमवत होते. नोकरी, शिक्षण, व्यवसाय सगळं कसं बदललं होतं, कात टाकत होतं. मोबाईल पासून मुलांना लांब ठेवा, योग्य अंतरावर ठेवा म्हणणारे आई बाप, पालक मोबाईल पासून मुलाना दूर जाऊ द्यायला तयार नव्हते. बदलत्या शिक्षणासमोर, पद्धतीसमोर पालक मुकाटपणे जमवून घेत होते. अर्थात प्रश्न पाल्याच्या भविष्याचा होता. आर्थिक हातघाईला आलेला सर्वसामान्य देखील तंत्रज्ञानाच्या अतिवापराबद्दल नाखूष पण मूग गिळून गप्प होता.  आता मोबाईल मुलांच्या आयुष्याचा भाग बनून राहिल

Rafiyat...

Image
स्थळ जुहू.... पण दिवस, तारीख तशी  आठवत नाही, ठिकाण नक्की आठवतंय, दुपार होती.  आता जायचं होतं पण कसं  ?. पाय घुटमळत होते . मनात अनेक प्रश्न  होते, भीती होती.  तितक्यात " क्या चाहिये" कोणीतारो ओरडलं . मी काहीच उत्तर देऊ  शकलो नाही, उत्तर नव्हत देखील द्यायला. काही वेळ जातो ना जातो तोच एकाने विचारलं , " किसी की मिट्टी आयी है क्या". पटकन नाही म्हणून गेलो. पण आयष्याचं सत्य, सगळ्या प्रश्नांची उत्तरं होती त्या प्रश्नात. त्या प्रश्नाने आत जाण्याचा धीर आला.  नियमानुसार विधी उरकून आत गेलो. जाणते, बुजुर्ग बसले होते. त्यांच्याशी बोलता क्षणी त्यांनी झाहीद नामक इसमास हाक मारली.  "इनको बता दो जरा " असं म्हणताच तो अदबीने आत आला आणि मला घेऊन गेला. काही अंतर चालतो तोच समोर बोट करून "उधर, वो देखो सामने "  असं म्हणून तो इसम निघून गेला. ३१ जुलै रोजी त्याचा या पृथ्वी वरचा प्रवास संपून पुढील प्रवास सुरु झाला, तो माझ्या समोर होता . फक्त  ३१ जुलै १९८० चा तो जनसागर इथे नव्हता. जाताना झाहीद काहीसं पुटपुटला , ते कानावर स्पष्टपणे पडलं , " वो उधर, नौशाद , उधर मधुबाला ...औ

एक गुणी संगीतकार - आनंद मोडक.

प्रतिभावंत कलावंताकडे संगीतातील पराकोटीची संवेदनशीलता असेल तर ती त्याच्या प्रतिभेला नवे आयाम देते,  इतरांपेक्षा त्याचे अलौकिकत्व सिद्ध करते. डेक्कनवरच्या महिला निवास च्या जागेत घाशीराम कोतवालच्या तालमीतून आंनद मोडकांनी आपल्या कला सेवेची सुरवात केली. ही सुरवात आपल्या आयुष्याचा प्रवास कुठे नेणार याची पुसटशी कल्पना देखील त्यांना नव्हती. डिसेंबर 1972 मधील नोकरीची सुरवात आणि भरत नाट्य मंदिर मधला घाशीराम चा पहिला प्रयोग. घाशीरामचा तो प्रवास पुढे 20 वर्षे चालूच होता. भास्कर चंदावरकर,  जब्बार पटेल यांसारखे गुरू मिळाले,  रवींद्र साठे, चंद्रकांत काळे, सतीश आळेकर यांच्या सारखे मित्र मिळाले. 'आनंद पर्व' मधून एक एक गोष्टी उलगडल्या होत्या. 1995-96 च्या वेळेची गोष्ट. माझी आणि आनंद मोडक यांची 'महानिर्वाण'च्या निमीत्ताने भेट नियतीने घडवून आणली आणि 2014 साली ती नियतीनेच संपवली सुद्धा. पण 'महानिर्वाण',  'बदकांचे गुपित' च्या तालमीच्या आठवणी आजही तश्याच आहेत. भारतभर नाटकाचे दौरे, नाटकाच्या तालमी, कार्यशाळा सगळं सगळं अजून तसच डोळ्यासमोर आहे. मदन मोहन, रोशन ही तर त्यांची
Image
डॅनियलस् नावाचा मराठी माणूस... १६ एप्रिल, प्रसिद्ध पियानो, अकॉर्डियन वादक, संगीत संयोजक, संगीतकार इनॉक डॅनियलस् यांचा वाढदिवस. १९५३ च्या 'गुळाचा गणपती' या सिनेमापासून पियानो वादक म्हणून आपल्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला सुरवात करणारा, अस्सल मराठी माणूस.  आज वयाच्या ८७ व्या वर्षी देखील तितकाच तरुण, अदबशीर व साधा जाणवतो. त्यांच्यावरील प्रबंधाचे लिखाण देखील त्यांच्याच वाढदिवशी लिहून पूर्ण केले ही माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट. मराठी चित्रपट संगीतातील त्यांचे अनमोल योगदान स्वीकारल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेले एक अजरामर गीत, " तुम्हावर केली मी मर्जी बहाल" हे त्यांच्या संगीत संयोजनाचे एक उत्तम उदाहरण सांगता येईल. यात डॅनियलस् यांनी कॉर्ड्स् सिस्टीम चा अतिशय उत्तम वापर केला आहे. वेस्टर्न हार्मनी वापरून सुध्दा ही लावणी अस्सल मराठी वाटते हे यातील विशेष. अनेक प्रकारचे संगीत ऐकून, आत्मसात करून, त्याचा योग्य वापर करून भारतीय चित्रपट संगीत कसे अधिकाधिक समृद्ध करता येईल याचा डॅनियलस् यांनी सतत प्रयत्न केला. आजही अकॉर्डियन घेऊन ते

Prajaktach zaad

हल्लीच एका रुळलेल्या सामाजिक कार्यक्रमात एक  प्राजक्ताचं झाड दिसलं, त्या झाडाची मुळही दिसली , घट्ट मातीत रुजलेली, आईला घट्ट चिटकून बसलेली मुलं असतात तशी. त्यांची भेट नाही झाली. भेट घ्यायची  हिम्मत नाही झाली.  कोणत्या  तोंडाने भेटणार, काय काय बोलणार ? प्रश्न पडत होते. कार्यक्रमाची सांगता झाली, आवराआवर करत  होतो. पण मनातून विषय दूर होत नव्हता. सत्यभामा-रुक्मिणी ची कहाणी डोक्यात घोळत होती.  प्राजक्ताचं झाड कोणी लावलं, कोणासाठी लावलं आणि कोणाच्या पदरातली फुलं ते वेंचतंय? कोणत्या निर्माल्याच तुम्ही फुल करताय ?.  सगळंच अतर्क्य आहे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं इतकं सोपं तत्वज्ञान सांगायला संत व्हावं लागत नाही. हेच सारखं जाणवत होतं. व्यवस्थेचे गोळे पचवत हे जग नक्की चाललंय कुठे . इतकं बेरकी का झालं आहे चांगुलपण. गाडगी मडकी घेऊन आयुष्य सत्कारणी लावणाऱ्या या संतांच्या जगात, ताव मारून, बोटं पुसत का चर्चिलं जातं शहाणपण ? डॉक्टर प्राजक्ता, डॉक्टर अभिजित माफ करा पण आम्ही माणसं नाही. माणसासारखी माणसं नाहीत. आमच्या असण्याला नोटेचा रंग आहे, पण घामाचा वास नाही. भोगण्याचा शाप नाही.  तुम्हाला काल ह